Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरअंतर्गत शोपियानमध्ये राबवलेलं ‘ऑपरेशन केलर’ काय आहे?
India-Pakistan war Update : ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आता भारतीय सुरक्षा दलाने जम्मू - काश्मीरच्या शोपियानमध्ये ऑपरेशन केलर राबवलं आहे.
जम्मू – काश्मीरच्या शोपियानमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या 3 दहशतवाद्यांचा काल भारतीय सैन्याकडून खात्मा करण्यात आलेला आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ऑपरेशन केलर राबवून ही कारवाई करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय रायफल्स युनिटला गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत शोपियानमध्ये भारतीय सुरक्षा दलाकडून ऑपरेशन केलर राबवण्यात आलेलं आहे. यात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलेलं आहे. हे तिन्ही दहशतवादी लष्कर-ए-तोयबाचे आहेत. यातील दोघांची ओळख पटलेली आहे. शाहिद कुट्टे आणि अदनान शफी दार अशी या दोन अतिरेक्यांची नावं आहे. तर तिसऱ्या दहशतवाद्याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही.
Published on: May 14, 2025 10:20 AM
Latest Videos