Sunil Kumar Martyr Jammu : लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण; लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार
Pakistan Firing Jammu Kashmir : राजौरी येथे सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात जवान सुनील कुमार शाहिद झाले आहेत. त्यांच्यावर आज पूर्ण लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार झाले.
जम्मू आणि काश्मीर लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार (वय, 25 वर्ष) यांचे पार्थिव रविवारी त्यांच्या मूळ गावी त्रेवा येथे पोहोचले. त्यानंतर याच ठिकाणी त्यांच्यावर पूर्ण लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. आरएस पुरा सेक्टरमध्ये तैनात असताना पाकिस्तानी हल्ल्यात सुनील कुमार शहीद झाले. यावेळी त्यांच्या घरी मोठ्या संख्येने लोक शोक व्यक्त करण्यासाठी आले. राजौरी येथे सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारामुळे पाकिस्तानी शेल त्यांच्या निवासस्थानी पडल्याने जम्मू आणि काश्मीर प्रशासन सेवा अधिकारी राज कुमार थापा यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, जम्मू आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुनील शर्मा आणि इतरांनी अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राजकुमार थापा यांना श्रद्धांजली वाहिली. जम्मूमध्ये झालेल्या त्यांच्या श्रद्धांजली समारंभाला सुरक्षा कर्मचाऱ्यांसह अनेक प्रशासकीय आणि राजकीय नेतेही उपस्थित होते.