फडणवीसांचा दिल्ली दौरा ‘या’ मंत्र्यांसाठी ठरणार संक्रात, कोणाचं नाव आघाडीवर? मंत्र्यांवर अंकुश ठेवण्याच्या हालचाली सुरू
दिल्लीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून अमित शहा यांची भेट घेण्यात आली आहे. दोघांमध्ये 25 मिनिट चर्चा झाली आहे. मंत्र्यांच्या वर्तनावरून मुख्यमंत्री फडणवीसांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असताना आज फडणवीस आणि शहा यांच्यात भेट झाली. दरम्यान, या भेटीमध्ये काय चर्चा झाली? किती मंत्र्यांची आता विकेट जाणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दिल्ली दौरा वादग्रस्त मंत्र्यांसाठी संक्रांत ठरण्याची चिन्हे आहेत. फडणवीस अमित शहांना भेटले असून यात वादग्रस्त मंत्र्यांना घरी पाठवण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या वादग्रस्त मंत्र्यांमुळे भाजपची बदनामी होत असल्याने मंत्र्यांवर अंकुश ठेवण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. यामध्ये सभागृहात रमी खेळणाऱ्या तसेच शासनाला भिकारी म्हणणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचे नाव आघाडीवर आहे.
कोकाटे यांचा राजीनामा घेण्याबाबत भाजप आग्रही असल्याच्या बातम्या असून राष्ट्रवादीकडून मात्र खाते बदलाचा पर्याय सुचवण्यात आलाय. दरम्यान, विकेट जाणाऱ्या मंत्र्यांमध्ये पहिले माणिकराव कोकाटे, दुसरे योगेश कदम आणि तिसरे संजय शिरसाट यांचं नाव चर्चेत आहे. दरम्यान भाजप अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे यांच्या शिवसेनेतील एकूण आठ मंत्री घरी जाणार असा दावा सामनातून करण्यात आलाय. सामनाच्या दाव्यानुसार संजय शिरसाट, योगेश कदम, भरत गोगावले, माणिकराव कोकाटे, दादा भुसे, नितेश राणे, जयकुमार गोरे आणि गिरीश महाजन या मंत्र्यांना वगळले जाणार असल्याचं बोललं जात आहे.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं

