नवी दिल्ली: गुजरात दंगली (Gujarat riots) प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना क्लिन चीट देण्यात आली आहे. याचसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘राजकारणात आयडिओलॉजी घेऊन आलेल्या पत्रकारांनी, एनजीओंनी आणि विरोधकांनी या प्रकरणात खोटी माहिती खरी दाखवण्याचा प्रयत्न केला. मीडियामध्ये देखील तशाच बातम्या चालल्या, मात्र तेव्हाही कधी आम्ही मीडियामध्ये हस्तक्षेप केला नाही, ना आज करतोय, असं अमित शाह यांनी म्हटलंय. गुजरात दंगल सरकारनं घडवल्याचा आरोप होता. या प्रकरणात गुजरातच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्यात आले. सुप्रीम कोर्टानं या प्रकरणात क्लिन चीट दिली आहे. दंगल सुनियोजित नव्हती, स्वयंप्रेरीत होती असे कोर्टानं म्हटलंय.