पक्षाच्या बैठकीला गैरहजर, शिंदेंच्या बैठकीला उपस्थित; अमोल कोल्हे यांनी काय स्पष्टीकरण दिलं?

आयेशा सय्यद, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 31, 2023 | 11:03 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सर्वपक्षीय खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे हजर होते. पाहा...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सर्वपक्षीय खासदारांची बैठक बोलावली होती. मविआतील अनेक खासदारांनी या बैठकीकडे पाठ फिरवली होती.या बैठकीला राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे हजर होते. काही दिवसांआधी राष्ट्रवादीच्या बैठकीला अमोल कोल्हे गैरहजर होते. मात्र कालच्या या बैठकीला हजर राहिल्याने चर्चा होतेय. अमोल कोल्हे मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा होत आहे. त्याला त्यांच्या या कृतीने हवा मिळाली आहे. यावर अमोल कोल्हे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“राज्याचे जे जे प्रश्न प्रलंबित आहेत त्यासाठी बैठक होती. तसंच माझ्या मतदारसंघातील काही प्रश्न होते त्याबाबत चर्चा केली. किल्ले शिवनेरीवर भगवा ध्वज नाही तो लावावा, अशी मागणी केली. ही बैठक ऐनवेळी ठरली त्यामुळे अनेकांना येता आले नाही. यापुढे आधी पूर्वसूचना देऊन मत बैठक बोलावली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिलं आहे, असं अमोल कोल्हे म्हणालेत.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI