Amol Kolhe | महिला आरक्षण विधेयकावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला

| Updated on: Apr 16, 2026 | 6:12 PM

लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा रंगत असताना खासदार अमोल कोल्हे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. विधेयकाला पाठिंबा दर्शवत असतानाच त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अमोल कोल्हे म्हणाले की, महिलांसाठी धोरणात्मक निर्णय घेणारे, संरक्षण दलात संधी देणारे आणि वडिलोपार्जित संपत्तीत महिलांना हक्क देणारे नेते म्हणजे शरद पवार आहेत. त्यामुळे महिला आरक्षण विधेयकाला आमचा मुळीच विरोध नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

तसंच, “हे करून आम्ही उपकार करत आहोत असं समजणाऱ्यांनी लक्षात ठेवावं, उपकार आपण करत नाही, तर आईने आपल्याला जन्म देऊन जग दाखवलं, हा तिचा आपल्यावर उपकार आहे,” असं भावनिक वक्तव्य करत त्यांनी सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. याशिवाय, ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकाची चर्चा करत असताना देशात अजूनही ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ सारखी मोहीम राबवावी लागते, ही बाब चिंताजनक असल्याचंही त्यांनी नमूद केलं. या वक्तव्यामुळे संसदेत पुन्हा एकदा महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापलं आहे.

Published on: Apr 16, 2026 06:12 PM
Follow Us