AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amol Mitkari : हाकेच्या डोक्यात शेण भरलंय, मिटकरींची विखारी टीका

Amol Mitkari : हाकेच्या डोक्यात शेण भरलंय, मिटकरींची विखारी टीका

| Updated on: Jun 03, 2025 | 2:38 PM
Share

Amol Mitkari Vs Laxman Hake : लक्ष्मण हाके आणि अमोल मिटकरी यांच्यातील शाब्दिक युद्ध चांगलंच तपलं आहे. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर नवा आरोप केला आहे. लक्ष्मण हाके यांनी आपल्या ड्रायव्हरचा 2 वर्षांचा पगार थकवला असल्याचा दावा मिटकरी यांनी केला आहे. मिटकरी यांनी हाके यांचा ड्रायव्हर सचिन बनगरचा मेसेज ट्विट करत हा आरोप केलेला आहे.

ओबीसी नेता लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या टिकेनंतर अमोल मिटकरी यांनी हाकेंवर हल्लाबोल केला. त्यानंतर मिटकरी आणि हाके यांच्यात चांगलीच जुंपलेली असताना आज पुन्हा एकदा मिटकरी यांनी लक्ष्मण हाके यांच्याविषयी ट्विट करत हाके यांनी ड्रायव्हरचा 2 वर्षांचा पगार दिलेला नसल्याचा मोठा दावा केला आहे. यावेळी बोलताना मिटकरी म्हणाले की, ओबीसीचा नेता कसा असावा याचं उत्तम उदाहरण गोपीनाथ मुंडे होते. ओबीसीच्या टाळूवरचं लोणी खाणारा हा दलाल हाके आहे. असं म्हणत मिटकरी यांनी हाकेवर टीका केली आहे.

Published on: Jun 03, 2025 02:38 PM