“निलेश राणे भाजपच्या तुकड्यावर जगणारा सरडा”, निलेश राणेंच्या ‘त्या’ ट्विटवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

“निलेश राणे भाजपच्या तुकड्यावर जगणारा सरडा”, निलेश राणेंच्या ‘त्या’ ट्विटवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

apeksha sakpal | Updated on: Jun 08, 2023 | 4:30 PM

या देशात मुस्लीम आणि ख्रिश्चन या दोन समाजांच्या बाबत चिंता वाटावी असं चित्र आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधान केलं होतं. या विधानावर भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी टीका केली. "औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार", असं खोचक ट्विट निलेश राणे यांनी केलं. निलेश राणे यांच्या ट्विटमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

अकोला : या देशात मुस्लीम आणि ख्रिश्चन या दोन समाजांच्या बाबत चिंता वाटावी असं चित्र आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधान केलं होतं. या विधानावर भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी टीका केली. “औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार”, असं खोचक ट्विट निलेश राणे यांनी केलं. निलेश राणे यांच्या ट्विटमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यावरुन आता राष्ट्रवादीचे काँग्रेसच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेता. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी निलेश राणे यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. ” निलेश राणे पवार साहेबांबद्दल बोलतायत. तुम्ही नक्की भारतात जन्माला आले होते की नेपाळ ला? तुमचा कदाचित हा तिसरा जन्म असावा पहिला नेपाळ दुसरा चिन आणि नंतर कोकणात. तुम्ही तर रंग बदलणाऱ्या सरड्यापेक्षाही भयंकर आहात! तुम्हाला भाजपने तुकडा टाकलाय तो यासाठीच”, असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

Published on: Jun 08, 2023 4:30 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us