अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग… सुषमा अंधारे संतापल्या
अमरावती येथे तीन बालकांच्या मृत्यू प्रकरणी आणि सहा जण जखमी झाल्याच्या घटनेनंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बावनकुळे राजस्थानमध्ये पाणीपुरी खात असतानाचा व्हिडिओ दाखवून अंधारे यांनी पालकमंत्र्यांच्या बेफिकीरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आमदार नितीन देशमुख यांनीही या गलथान कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
अमरावती जिल्ह्यातील धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. अमरावती येथे तीन बालकांचा मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले आहेत. या गंभीर घटनेनंतरही पालकमंत्री राजस्थानमध्ये पाणीपुरी खात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री बावनकुळे यांच्यावर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री म्हणून बावनकुळे यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “पालकमंत्र्यांनी तात्काळ लक्ष घालून रुग्णालयासाठी आवश्यक सुविधा पुरवल्या असत्या, तर कदाचित या बाळांचा जीव वाचला असता,” असे अंधारे म्हणाल्या.
पालकमंत्र्यांनी अशा दुःखद प्रसंगी जिल्ह्यात उपस्थित राहण्याऐवजी पाणीपुरी खाण्यात मग्न राहणे हे निगरगठ्ठापणाचे लक्षण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आमदार नितीन देशमुख यांनीही पालकमंत्र्यांच्या अतिशय गलथान कारभारावर जोरदार टीका केली आहे. आपल्या जिल्ह्यात अशी घटना घडलेली असतानाही पालकमंत्र्यांनी इतकी बेफिकीरी दाखवणे हे अत्यंत संतापजनक असल्याचे देशमुख यांनी नमूद केले आहे.
Published on: Aug 26, 2026 05:04 PM
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग...
थरकाप उडवणारे दृश्य! पूराच्या हाहाकारात 132 भारतीय पर्यंटकांचा मृत्यू
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार-डी.के. शिवकुमार
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट

