…तर युतीत राहायचं की नाही ठरवावं लागेल; शिवसेनेच्या युवा नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
महायुतीत खडा टाकण्याचं काम रवी राणा करत आहेत. शिवसनेच्या नेत्याबाबत आर्वाच्च बोलणं योग्य नाही. खोटी प्रमाणपत्र बनवून रवी राणा यांनी जनतेचा विश्वास घात केला. जनतेने त्यांना जागा दाखवली, असे वक्तव्य करत अभिजित अडसूळ यांनी राणांवर निशाणा साधला.
अमित शहा यांनी राज्यपालपदाचा शब्द दिला होता. मात्र तो शब्द पाळला गेला नाही. हा शब्द पाळला नाहीतर नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचं प्रकरण उघडं करावं लागेल असा इशारा आनंदराव अडसूळ यांनी भाजपला दिला होता. यावर बोलताना अभिजित अडसूळ यांनी आपली भूमिका मांडली. शिवसेनेला दोन राज्यपाल पद देण्याचे आश्वासन दिले होते. दोन वर्ष झाली त्याला मात्र त्यावर कोणताही निर्णय नाही, असे अडसूळ म्हणाले. पुढे त्यांनी रवी राणांवर देखील निशाणा साधला ते म्हणाले, रवी राणा हे वाचाळ बोलतात. राणा यांनीच त्यांच्या पत्नीचा घात करून त्यांना पाडलं. जिल्ह्यातील एकाही नेत्यासोबत त्यांचे चांगले संबध नाही. असे म्हणत आनंदराव अडसूळ हे महायुतीचे नेते आहेत. आमच्या नेत्याबाबत अशी भाषा वापरली जात असेल तर युतीत रहायचं की नाही हाही विचार करावा लागेल, असा इशाराच यावेळी त्यांनी दिला.
Latest Videos
Latest News