Anandrao Adsul | आनंदराव अडसूळांच्या घरी ईडीचे छापे, सिटी को-ऑप बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीचा छापा

आनंदराव अडसूळ यांच्या अमरावतीच्या घरी ईडीने छापेमारी करायला सुरुवात केली आहे. अमरावतीच्या घरासह ईडीने आणखी काही ठिकाणी छापेमारी केली आहे.

आनंदराव अडसूळ यांच्या अमरावतीच्या घरी ईडीने छापेमारी करायला सुरुवात केली आहे. अमरावतीच्या घरासह ईडीने आणखी काही ठिकाणी छापेमारी केली आहे. शिवसेनेचे अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Andandrao Adsul ) यांना ईडीने (ED) सिटी को ऑपरेटिव्ह बँकेतील (City Co-operative Bank) 900 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. ईडीनं अद्याप ताब्यात घेतल्याच्या वृत्ताची पुष्टी केलेली नाही.  सिटी को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.  भाजपचे सहयोगी आमदार रवी राणा यांच्या तक्रारीनंतर आता ईडी त्यांची चौकशी करत आहे. ईडीचे अधिकारी आज सकाळी  6 वाजता अडसूळ यांच्या घरी पोहोचल्याची माहिती मिळाली होती.आनंदराव अडसूळ यांच्याबरोबर त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांनाही ईडीने समन्स पाठवल्याची माहिती आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI