AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आनंदराव अडसूळ ईडीच्या ताब्यात, तब्येत बिघडल्याने अॅम्ब्युलन्स बोलावली!

तीन ते चार तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी आनंदराव अडसूळ यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्याचवेळी अडसूळ यांची तब्येत बिघडली आहे. त्यांच्या मुंबईतल्या घरी तातडीने अॅम्ब्युलन्स बोलाविण्यात आली आहे.

आनंदराव अडसूळ ईडीच्या ताब्यात, तब्येत बिघडल्याने अॅम्ब्युलन्स बोलावली!
आनंदराव अडसूळ
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Sep 27, 2021 | 11:03 AM
Share

मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीने ताब्यात घेतल्याची माहिती कळतीय. सकाळी त्यांना ईडीने समन्स पाठवलं होतं. चौकशीसाठी ईडीचे अधिकारीही त्यांच्या घरी दाखल झाले होते. अखेर तीन ते चार तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्याचवेळी अडसूळ यांची तब्येत बिघडली आहे. त्यांच्या मुंबईतल्या घरी तातडीने अॅम्ब्युलन्स बोलाविण्यात आली आहे. गोरेगावच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.

आनंदराव अडसूळ यांच्यावर सिटी बँकेत 900 कोटी रुपये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. याचप्रकरणी आज त्यांना आणि त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांना ईडीने समन्स पाठवलं होतं. सकाळी 7 ते 7.30 वाजण्याच्या सुमारास ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर काही तास त्यांची चौकशी करण्यात आली. अखेर पावणे अकराच्या सुमारास त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येतीय.

आनंदराव अडसूळ यांच्यावर सिटी को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये घोटाळा केल्याचा आरोप आहे. सिटी बँकेत 900 कोटींच्या घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आमदार रवी राणा यांच्या तक्रारीनंतर आता ईडी त्यांची चौकशी करणार आहे.

आनंदराव अडसूळ सिटी बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात बँकेत 900 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. अडसूळांचे नातेवाईक बँकेच्या संचालक मंडळावर होते. त्याचवेळी कर्ज वाटपात अनियमितता आणि NPA मध्ये घसरण झाली. घसरणीमुळे बँक गेल्या 2 वर्षांपासून बँक बुडीत आहे. खातेदारांनी अनेक वेळा अडसूळ यांची भेट घेतली पण अडसूळांनी खातेदारांची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचा आरोप आहे.

आनंद अडसूळ यांच्यावर कोणते आरोप?

आंनदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑप बँकेत घोटळा केल्याचा आरोप बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी 5 जानेवारी रोजी केला होता. आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात कागदपत्रं सादर करण्यासाठी ईडी कार्यालयातही ते गेले होते. “सिटी को-ऑप बँकेच्या मुंबईमध्ये 13-14 शाखा आहेत. या बँकेत 900 खातेदार आहेत. ही बँक बुडण्यास अनधिकृतरित्या वाटलेली कर्ज कारणीभूत आहे,” असा आरोप रवी राणांनी केला होता. तसेच, आनंदराव अडसूळांनी बँकेची प्रॉपर्टी भाड्यानं दिली. आता खातेदारांना केवळ 1 हजार एवढी रक्कम मिळत आहे, असंही रवी राणा म्हणाले होते.

ईडी अडसूळ यांच्यावर कारवाई करेल,राणांना विश्वास

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांवर कारवाई करणार का ?, असा सवाल रवी राणांनी विचारला आहे. सरकार आनंदराव अडसूळ यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. अडसूळ यांची केस दाबण्याचा प्रयत्न होत होता, आज ईडीने त्यांना समन्स पाठवलं आहे. ईडी त्यांची चौकशी करेल आणि कारवाई देखील होईल, अशी अपेक्षा आहे, असं रवी राणा म्हणाले.

कोण आहेत आनंदराव अडसूळ?

– आनंदराव अडसूळ हे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार – 1996 पासून पाच वेळा खासदारकी – शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांमध्ये अडसूळांचा समावेश – गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांकडून पराभवाचा धक्का

हे ही वाचा :

शिवसेनेचा आणखी एक नेता ईडीच्या फेऱ्यात?, आनंदराव अडसूळ ED कार्यालयात हजर

आनंदराव अडसूळांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं, सोमय्यांची ED-RBI कडे चौकशीची मागणी

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा