शिवसेनेचा आणखी एक नेता ईडीच्या फेऱ्यात?, आनंदराव अडसूळ ED कार्यालयात हजर

शिवसेनेचे नेते आणि अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) हे ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. Shivsena Anandrao Adsul ED

शिवसेनेचा आणखी एक नेता ईडीच्या फेऱ्यात?, आनंदराव अडसूळ ED कार्यालयात हजर
आनंदराव अडसूळ,माजी खासदार
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 4:13 PM

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) हे सक्तवसुली संचालनालयात पोहोचले आहेत. येथे ईडीकडून त्यांची चौकशी होणार असून त्यामुळे ते ईडीच्या कार्यालयात हजार झाल्याचे सांगण्यात येत आहे. आंनदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑप बँकेत घोटळा केल्याचा आरोप वडनेराचे विद्यमान आमदार रवी राणा यांनी केला होता. त्यानंतर अडसूळ यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी देखील आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात तक्रार केली होती. (Shivsena Leader ex MP Anandrao Adsul present at ED office)

आनंदराव अडसूळ यांच्यावर कोणते आरोप?

आंनदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑप बँकेत घोटळा केल्याचा आरोप बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी 5 जानेवारी रोजी केला होता. आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात कागदपत्रं सादर करण्यासाठी ईडी कार्यालयात आलो असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं होतं. “सिटी को-ऑप बँकेच्या मुंबईमध्ये 13-14 शाखा आहेत. या बँकेत 900 खातेदार आहेत. ही बँक बुडण्यास अनधिकृतरित्या वाटलेली कर्ज कारणीभूत आहे,” असा आरोप रवी राणांनी केला होता. तसेच, आनंदराव अडसूळांनी बँकेची प्रॉपर्टी भाड्यानं दिली. आता खातेदारांना केवळ 1 हजार एवढी रक्कम मिळत आहे, असंही रवी राणा म्हणाले होते.

किरीट सोमय्यांची आनंदराव अडसूळ यांच्याविरोधात तक्रार

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शड्डू ठोकला होता. किरीट सोमय्या यांनी अडसूळ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सिटी सहकारी बँकेच्या घोटाळ्यात आंनदराव अडसूळ यांची भूमिका असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. आनंदराव अडसूळ यांच्यावरील सर्व आरोपांची चौकशी करण्याची विनंती सोमय्या यांनी सक्तवसुली संचालनालय (ED) आणि भारतीय रिझर्व्ह बँकेला केली होती. (Shivsena Leader ex MP Anandrao Adsul present at ED office)

कोण आहेत आनंदराव अडसूळ?

– आनंदराव अडसूळ हे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार – 1996 पासून पाच वेळा खासदारकी – शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांमध्ये अडसूळांचा समावेश – गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांकडून पराभवाचा धक्का

संबंधित बातम्या:

किरीट सोमय्यांचा मोठा आरोप, शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ ED च्या रडारवर

आनंदराव अडसूळांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं, सोमय्यांची ED-RBI कडे चौकशीची मागणी

(Shivsena Leader ex MP Anandrao Adsul present at ED office)

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.