Matheran | माथेरानच्या घोड्यांसाठी देवदूत ठरले अनंत अंबानी; मोफत उपचारांनी दिला दिलासा

| Updated on: Jun 02, 2026 | 4:46 PM

वाहनमुक्त पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या माथेरानमधील घोड्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. माथेरानमध्ये पर्यटकांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या सुमारे 750 घोड्यांची व्यापक आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यांच्या उपचारांनाही गती मिळाली आहे.

अनंत अंबानी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या ‘अनंत सेवा फाउंडेशन’च्या पुढाकारातून विशेष वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये सर्व घोड्यांची मोफत आरोग्य तपासणी, जंतनिर्मूलन, लसीकरण आणि आवश्यक वैद्यकीय उपचार करण्यात आले. तसेच जखमी आणि आजारी घोड्यांवर तातडीने उपचार करून त्यांना योग्य वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली.

माथेरानमधील पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात घोड्यांवर अवलंबून असून स्थानिक अर्थव्यवस्थेत त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. सुमारे 3,500 स्थानिक नागरिकांचा रोजगार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे या घोड्यांशी संबंधित असल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

घोड्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे स्थानिक घोडेमालक, व्यावसायिक आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रयत्नामुळे केवळ प्राण्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार नसून माथेरानच्या पर्यटन व्यवस्थेलाही मोठा दिलासा मिळणार असल्याचे मानले जात आहे.

Published on: Jun 02, 2026 4:45 PM
Follow Us