AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anil Parab : चड्डी, बनियन गँग उघडी-नागडी फिरतेय, त्यांना कपडे द्या; अनिल परबांनी चांगलच सुनावलं

Anil Parab : चड्डी, बनियन गँग उघडी-नागडी फिरतेय, त्यांना कपडे द्या; अनिल परबांनी चांगलच सुनावलं

| Updated on: Jul 14, 2025 | 3:28 PM
Share

Maharashtra Assembly Session : ठाकरे गटाच्या अनिल परब यांनी आज विधान भवनात बोलताना मंत्री संजय शिरसाट यांच्या व्हायरल व्हिडीओवर टीका केली.

सध्या चड्डी – बनियन गँग किंवा चड्डी – टॉवेल गँगचे व्हिडिओ महाराष्ट्रभर फिरत आहेत. राज्याचे मंत्री उघडे – नागडे फिरत आहेत. त्यांना कपडे द्या. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करा, असा खोचक टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषदेतील सदस्य अनिल परब यांनी विधान परिषदेत बोलताना लगावला आहे. शिंदेंचे मंत्री संजय शिरसाट यांच्या बेडरूममधल्या व्हायरल व्हिडीओवरून परब यांनी ही टोलेबाजी केली आहे.

यावेळी बोलताना अनिल परब म्हणाले की, सध्या चड्डी बनियन गँग किंवा चड्डी टॉवेल गँगचे व्हिडिओ सध्या महाराष्ट्रभर फिरत आहेत. या गँगचे व्हिडिओ विशेषतः एका मंत्र्याचे बेडरूममधील व्हिडिओ बाहेर येत आहेत. हे सगळे उघडे फिरत आहेत. त्यांना सरकारतर्फे एक-दोन कपडे तर द्या. काय चाललंय महाराष्ट्रात? मंत्री उघडे नागडे फिरत आहेत. बेडरूमधला व्हिडिओ आला कसा बाहेर ? बेडरूममधले व्हिडिओ बाहेर येत आहेत याचा अर्थ मंत्री सुरक्षित नाहीत. बेडरूममध्ये सूट घालून झोपा असे मी सांगितलेच नाही. पण तुमची यंत्रणा बेडरूमपर्यंत पोखरली गेली आहे असे मला सांगायचे आहे. डिझिटलायझेशन फ्रॉड हा थेट मंत्र्यांच्या घरापर्यंत गेला आहे. त्यामुळे मंत्रीच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचे काय हाल असतील? हे सांगणे न बरे, अशीही तिखट टीका परब यांनी केली आहे.

Published on: Jul 14, 2025 03:22 PM