Anil Parab | Kirit Somaiya न्यायाधीश नाहीत, त्यांना उत्तर द्यायला मी बांधील नाही
सुरूवातीपासून मी ही बाब कोर्टात सिद्ध करत आहे. तसेच त्याबाबतीतल सर्व कागद पत्र ही न्यायालयात दिलेली आहेत. त्यामुळे त्यांच्या म्हणण्यावर जाण्याचे काही कारण नाही. ते काही न्यायाधीश नाहीत, त्यांना उत्तर द्यायला मी बांधील नाही असेही परब म्हणाले.
मुंबई : रत्नागिरीतील साई रिसॉर्ट प्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांना ईडीने झटका दिला. तसेच त्यांची 10 कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त केली आहे. यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी परब यांच्यावर टीका केली होती. तसेच आणखीन दोन गुन्हे दाखल होणार असल्याचेही ते म्हणाले होते. त्यावर अनिल परब यांनी आपली प्रतिक्रीया दिली
सोमय्या यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना, परब यांनी आपण सोमय्या यांना उत्तर देण्यास बांधिल नाही. तसेच त्या संपत्तीशी आपला काही संबंध नसल्याचे म्हटलं आहे.
तसेच सुरूवातीपासून मी ही बाब कोर्टात सिद्ध करत आहे. तसेच त्याबाबतीतल सर्व कागद पत्र ही न्यायालयात दिलेली आहेत. त्यामुळे त्यांच्या म्हणण्यावर जाण्याचे काही कारण नाही. ते काही न्यायाधीश नाहीत, त्यांना उत्तर द्यायला मी बांधील नाही असेही परब म्हणाले.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

