Anjali Damania | अशोक खरात प्रकरणात नवीन नाव समोर, बडा नेता कोण? दमानिया म्हणाल्या, ते नाव ऐकून दु:खं झालं
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदूबाबा अशोक खरात यांच्या संपर्कात असलेल्या राजकारण्यांची तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावे जाहीर केली आहेत. त्यांनी याआधीच संबंधित राजकारण्यांची नावे समोर आणणार असल्याचे संकेत दिले होते. दमानिया यांनी नाशिकचे आमदार नितीन पवार, चंद्रकांत पाटील, तसेच चंद्रकांत पाटलांचे पीए मंगेश देशपांडे, उदय सांगळे (सिन्नरमधून निवडणूक लढलेले), विधान परिषदेचे आमदार शिवाजी शहाणे, पद्मश्री पोपटराव पवार, रामदास खेडकर (दादा भुसे यांचे पीए), दीपक केसरकर, तसेच राहुल कोतडे (ओएसडी विखे पाटील), प्रभाकर काळे यांची नावेही जाहिर केली.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदूबाबा अशोक खरात यांच्या संपर्कात असलेल्या राजकारण्यांची तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावे जाहीर केली आहेत. त्यांनी याआधीच संबंधित राजकारण्यांची नावे समोर आणणार असल्याचे संकेत दिले होते. दमानिया यांनी नाशिकचे आमदार नितीन पवार, चंद्रकांत पाटील, तसेच चंद्रकांत पाटलांचे पीए मंगेश देशपांडे, उदय सांगळे (सिन्नरमधून निवडणूक लढलेले), विधान परिषदेचे आमदार शिवाजी शहाणे, पद्मश्री पोपटराव पवार, रामदास खेडकर (दादा भुसे यांचे पीए), दीपक केसरकर, तसेच राहुल कोतडे (ओएसडी विखे पाटील), प्रभाकर काळे यांची नावेही जाहिर केली. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कॉल डिटेल्सही समोर आणल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तसेच या यादीत नवीन नाव म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचे नाव असल्याचेही त्यांनी सांगितले. या संदर्भात बोलताना दमानिया म्हणाल्या की, जयंत पाटील यांचे नाव पाहून मला धक्का बसला असून जयंत पाटलांकडून अशी अपेक्षा नव्हती. “अशा बाबांकडे भविष्य विचारायला त्यांना कोण घेऊन गेले माहीत नाही. कदाचित मी चुकीची असेन, परंतु आतापर्यंत ते मला चांगले वाटत होते,” असेही त्यांनी नमूद केले.
Published on: Apr 15, 2026 01:16 PM
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर

