Anjali Damania : ‘ही गुंड प्रवृत्ती…त्या हॉटेलचं नुकसान शिंदेंनी भरून द्यावं’, कामराच्या शोच्या सेटची तोडफोड अन् दमानियांचा निशाणा
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या शिंदे यांच्यावरील गाण्यामुळे वादंग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी कामरा याच्या द हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड केली. यावर अंजली दमानिया यांनी भाष्य केले आहे.
‘स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा जे म्हणाले ते जर अवडलं नसेल तर त्यांच्या विरुद्ध कायद्याने लढणं अपेक्षित आहे’, असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. दरम्यान, कुणाल कामरा याच्या द हॅबिटॅट स्टुडिओची शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली आहे. यावर अंजली दमानिया यांनी ट्वीट करत आपलं परखड मतं व्यक्त केलं आहे. ‘सत्तेत असताना कायदा हातात घेऊन हॉटेलमध्ये शिवीगाळ करणं, तोडफोड करणं याला गुंड प्रवृत्ती म्हणतात, असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय. पुढे त्यांनी असंही म्हटलंय की, कुणाल कामरावर सोडा आधी FIR एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांवर करा, अशी मागणी अंजली दमानियांनी यावेळी केली. दरम्यान, शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आलेल्या हॉटेलचे झालेले नुकसान सुद्धा एकनाथ शिंदेंनी भरून दिले पाहिजे. आपण लोकशाहीत राहतो आणि इथे कायद्याचे राज्य राहील, गुंडगिरीचे नाही, असंही अंजली दमानिया यांनी म्हटलंय.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

