रिचार्जवाली बाई, गुलाबी जॅकेट अन् वाल्याचा वाल्मिकी; 17 तारखेला आर-पार, दमानियांचं दादांना चॅलेंज
अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा अजित पवार यांच्याकडे वळवला आहे. येत्या १७ तारखेला आपण लंडनवरून पुन्हा मुंबईत येत आहोत, माझ्या तीन वर्षांच्या उत्पन्नाची कागदपत्र मी आणते, अजित पवारांनीही आणावीत असं आव्हान त्यांनी दिलंय. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट....
अंजली दमानिया आणि अजित पवारांमधला वाद आता उत्पन्नापर्यंत आला आहे. रिचार्जवाली बाई म्हणत दमानियांनी परदेश दौरे आणि उत्पन्नाचे स्रोत सांगावे, असं म्हणत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाणांनी निशाणा साधला. त्यावरुन आपण १७ तारखेला, उत्पन्नाचे कागदपत्र घेवून मुंबईत येते. अजित पवारांनीही यावं, असं चॅलेंज दमानियांनी दिलं आहे. अंजली दमानिया सध्या लंडनमध्ये आहेत. पुन्हा अजित पवारांसोबतच्या वादाची सुरुवात दमानियांच्याच ट्विटनं झाली आहे. लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यापासून अजित पवार गुलाबी जॅकेटमध्ये फिरतायत. त्याच गुलाबी जॅकेटवरुन दमानियांनी अजित पवारांना डिवचलं. गुलाबी जॅकेट घालून, गुलाबी गाड्या आणि बसेस फिरवून, जन सन्मान होत नसतो. त्या जनतेने कष्टाने कमावलेल्या पैशातून भरलेल्या कराचा अपव्यय न करणे, भ्रष्टाचार न कारणे हा जनतेचा खरा सन्मान होईल. तो तुमच्यांनी या जन्मी शक्य होणार नाही. केवळ गुलाबी जॅकेट घालून वाल्याचा वाल्मिकी होत नसतो, असा हल्लाबोल त्यांनी केला. यावर प्रफुल्ल पटेल यांनी पलटवार केलाय. बघा काय म्हणाले?
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात

