Anjali Damania Video : '...त्यानंतर फडणवीस, अजितदादा मुंडेंची पाठराखण करणारच नाहीत', अंजली दमानिया काय करणार गौप्यस्फोट?

Anjali Damania Video : ‘…त्यानंतर फडणवीस, अजितदादा मुंडेंची पाठराखण करणारच नाहीत’, अंजली दमानिया काय करणार गौप्यस्फोट?

| Updated on: Feb 03, 2025 | 4:24 PM

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरणासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया उद्या पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत मोठा खुलासा करणार असल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. उद्या सकाळी ११ वाजता अंजली दमानिया या पत्रकार परिषद घेणार आहे. मात्र यापूर्वीच त्यांनी मोठं भाष्य केले आहे. पुरावे दाखवल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित […]

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरणासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया उद्या पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत मोठा खुलासा करणार असल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. उद्या सकाळी ११ वाजता अंजली दमानिया या पत्रकार परिषद घेणार आहे. मात्र यापूर्वीच त्यांनी मोठं भाष्य केले आहे. पुरावे दाखवल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार धनंजय मुंडे यांची पाठराखण करणार नाहीत, असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय. तर तेच पुरावे भगवानगडावर स्वतः नेणार असल्याचे म्हणत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी कऱणार असल्याचे अंजली दमानिया म्हणाल्या. तर जोपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळणार नसल्याचेही अंजली दमानिया यांनी म्हटलंय. आज टीव्ही 9 ला प्रतिक्रिया देत भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. तर हे सगळे पुरावे अतिशय धक्कादायक आहेत, ते उद्या जनतेपुढे येतील, त्यानंतर नक्कीच मोठा निर्णय घ्यायला जनता सरकारला भाग पाडेल, असा विश्वास अजंली दमानिया यांनी व्यक्त केला.

Published on: Feb 03, 2025 04:19 PM