Anjali Damania : सुरेश धस नवा वाल्मिक कराड बनवत आहेत, अंजली दमानियांचे गंभीर आरोप
Anjali Damania On Suresh Dhas : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेत सुरेश धस आणि सतीश भोसले यांचे सोबतचे फोटो दाखवून आमदार धस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
आमदार सुरेश धस हे नवा वाल्मिक कराड तयार करत आहेत, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे. बीडच्या शिरूर येथे एका गरीब व्यक्तीला सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले हा अमानुषपणे बेदम मारहाण करत असल्याचा एक व्हिडिओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओनंतर अंजली दमानिया यांनी धस यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दमानिया यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसलेचे आणखी काही व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सतीश भोसलेचे काही फोटो देखील त्यांनी दाखवले आहेत. सुरेश धस हे नवा वाल्मिक कराड तयार करत असल्याचा आरोप यावेळी पत्रकारांशी बोलताना दमानिया यांनी केला आहे.
पुढे बोलताना दमानिया म्हणाल्या की, एका व्हिडीओमध्ये हा सतीश भोसले सरकार, दहशत आणि पैसा आमचा असल्याचे म्हणतोय. सेम जे कराडचे होते ते मोठ्या मोठ्या २५ गाड्या घेऊन जातानाचे सेम तसेच व्हिडीओ सतीश भोसलचे सुद्धा आहेत. यामुळेच असे वाटते की, हे सर्वजण एका माळेचे मणी आहेत आणि हे सगळं राजकारण्यांच्या वरदहस्ताने सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर अधिवेशनात बोलायला हवं. यावेळी अंजली दमानिया या सुरेश धस आणि सतीश भोसले यांचे फोटो दाखवत हेच फोटो घेऊन आपण उदय अधिवेशनाच्या बाहेर आंदोलनाला बसणार असल्याचं म्हंटलं आहे.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
