संसदेतील ‘त्या’ इंग्रजी प्रश्नावर नारायण राणे गोंधळले, अंजली दमानियांचा ट्वीटद्वारे निशाणा; म्हणाल्या…
अंजली दमानिया यांनी भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना इंग्रजीत विचारलेल्या प्रश्नावर राज्यसभेत गडबडल्याचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. कामागारांच्या प्रश्नासाठी काय पावलं उचलणार आहात? असा प्रश्न राणे यांना विचारण्यात आला. पण तो प्रश्न इंग्रजीत विचारण्यात आल्याने नारायण राणे चांगलेच गोंधळ्याचे पाहायला मिळाले.
मुंबई, ७ फेब्रुवारी २०२४ : संसदेमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या खात्याबद्दल विचारल्या गेलेल्या एका प्रश्नावर उत्तर दिलं. मात्र विरोधक त्यावर समाधानी न झाल्याने अखेर लोकसभा अध्यक्षांनी सूचना केली. दरम्यान, नारायण राणे यांच्या उत्तरावर अंजली दमानिया यांनी सडकून टीका केली आहे. विरोधी पक्षातील खासदाराने नारायण राणेंना प्रश्न केला की, आपल्या मंत्रालयाद्वारे कामगारांच्या कल्याणासाठी कोणती पावलं उचलली गेली, कोणत्या योजना आणल्या गेल्या? दरम्यान, लोकसभेत इंग्रजीत विचारलेल्या प्रश्नावर नारायण राणे चांगलेच गडबडले असल्याचे पाहायला मिळाले. तर नारायण राणे यांनी दिलेल्या उत्तरावर अंजली दमानिया यांनी ट्वीटरवर एक व्हिडीओ शेअर करत खोचक टीका केली. …असं उत्तर मिळत असेल तर दुदैव.. बघा नेमकं काय म्हणाल्या अंजली दमानिया…
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक

