Sambhajinagar : सप्तकुंड धबधबा बघण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला
Ajantha Caves Bee Attack : गडकिल्ले किंवा पुरातन वास्तूच्या ठिकाणी मधमाशांच्या हल्ल्याच्या अनेक घटना वारंवार समोर येत असून संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील जगप्रसिद्ध अंजिठा लेणीत आग्या मोहोळ मशमाशांच्या हल्ल्याचे सत्र सुरूच आहे. सप्तकुंड धबधबा बघण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात 200 पेक्षा अधिक पर्यटक जखमी झाले आहेत. मार्च महिन्यापासून याठिकाणी वारंवार पर्यटकांवर मधमाशांचे हल्ले होत आहेत. त्यामुळे अनेक पर्यटक जखमी देखील झालेले आहेत. बकरी ईदची सुटी आणि विकेंड असल्यामुळे शनिवार-रविवारमुळे लेणी बघणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली होती. त्यातच अचानक दुपारी मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केला.
दरम्यान, मधमाशांनी हल्ला केल्यानंतर पर्यटकांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यामुळे बचावासाठी सुरक्षित जागा शोधण्यासाठी पळापळ देखील झाली. 200 पेक्षा अधिक पर्यटक यात जखमी झालेले आहेत. त्यामुळे या सातत्याने होणाऱ्या या मधमाशांच्या हल्ल्यावर ठोस उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी पर्यटकांकडून केली जात आहे.

उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांच्यात घमासान, अॅम्ब्युलन्स, मुडदा अन्...

मनसे युतीबाबत ठाकरे सकारत्मक, जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत दिला एकच आदेश

हिंदी बोलेंगे, पढेंगे कोई रोक सके तो..,सदावर्तेंचं राज ठाकरेंना चॅलेंज

एअर इंडियाच्या पक्षी धडकला अन्... आणखी एक दुर्घटना टळली, बघा काय घडलं?
