‘मविआ’त मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे जाहीर मेळाव्यात म्हणतात …
मुंबईत आज महाविकासआघाडीचा निर्धार मेळावा पार पडला. यामध्ये निर्धार मेळाव्यातून आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले. यावेळी ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा. मी तुम्हाला पाठिंबा देतो. कोणाचेही नाव जाहीर करा. मग उद्धव ठाकरे असो की अन्य कोणी, माझा पाठिंबा असणार आहे.
उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या प्रचाराचे प्रमुख नेते असणार आहेत. यामुळे उद्धव ठाकरेंच्याच नेतृत्वात राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रचार होणार आहे. तर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. दरम्यान, आज मविआचा निर्धार मेळावा होत आहे. यामध्ये ‘मविआ’त मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? याबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे सांगितले, महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण होणार? असे विचारले जात आहे. आजच्या मेळाव्यास पृथ्वाराज चव्हाण आहेत, शरद पवार आहेत. मी त्यांना सांगतो, आता मुख्यमंत्रीपदाचा जाहीर करा. मी तुम्हाला पाठिंबा देतो. कोणाचेही नाव जाहीर करा. मग उद्धव ठाकरे असो की अन्य कोणी, माझा पाठिंबा असणार आहे, असे ठाकरे म्हणाले. ते पुढे असेही म्हणाले, शरद पवार आणि पृथ्वीराजजी तुम्ही आता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा. मी पाठिंबा देईल. मी माझ्यासाठी लढत नाही. मी मुख्यमंत्रीपद सोडले ते महाराष्ट्रासाठी. महाराष्ट्र झुकवण्याची कोणाची हिंमत होणार नाही. जो महाराष्ट्राला झुकवण्याचे काम करतो त्याला गाडून टाकतो, असेही यावेळी ठाकरे म्हणाले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

