“मायबाप शांतता राखा, प्रचंड वेगाने प्रेम करा”, संगमनेरच्या दगडफेकीनंतर अन्सार चाचांचं आवाहन
संगमनेरमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते. पण या मोर्चाला गालबोट लागलं. संगमनेरच्या समनापूर गावात दोन गटात दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे. या दगडफेकीत गाड्यांचं मोठं नुकसान झाले आहे.
अहमदनगर : संगमनेरमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते. पण या मोर्चाला गालबोट लागलं. संगमनेरच्या समनापूर गावात दोन गटात दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे. या दगडफेकीत गाड्यांचं मोठं नुकसान झाले आहे. तर 2 जण जखमी झाले आहेत. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान संगमनेरच्या ज्या समनापुरमध्ये दोन गटात दगडफेक झाली ते समनापुर ओळखलं जातं इथल्या प्रसिद्ध वडापावसाठी आणि तो बनवणाऱ्या अन्सार चाचांसाठी. अन्सार चाचा यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत. या अन्सार चाचांनी घरासमोरच दगडफेकीची घटना घडल्यानंतर आपल्या खास शैलीत सगळ्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी पाहा हा खास व्हिडीओ…
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले

