Loudspeaker Controversy : धार्मिक स्थळावरील भोंग्यांच्या परवानगीसाठी अर्ज, नाशिकच्या भद्रकाळी पोलीस स्टेशनमध्ये पहिला अर्ज दाखल

धार्मिक स्थळावरील भोग्यांच्या परवानगीसाठी अर्ज येण्यास सुरुवात झाली आहे. भोंग्यांच्या परवानगीसाठी नाशिकमधील भद्रकालीत पाहिला अर्ज आला आहे. कादरी मशिदीचे विश्वस्त हाजी आरिफ सय्यद यांच्याकडून अर्ज दाखल झाल्याची माहिती आहे.

मनोज कुलकर्णी

| Edited By: शुभम कुलकर्णी

Apr 21, 2022 | 9:39 AM

नाशिक : धार्मिक स्थळावरील भोग्यांच्या परवानगीसाठी अर्ज येण्यास सुरुवात झाली आहे. भोंग्यांच्या परवानगीसाठी नाशिकमधील भद्रकालीत पाहिला अर्ज आला आहे. कादरी मशिदीचे विश्वस्त हाजी आरिफ सय्यद यांच्याकडून अर्ज दाखल झाल्याची माहिती आहे.  नाशिकमध्ये पोलीस (Police) आयुक्त दीपक पांडेय यांनी भोंग्याविरोधात कडक कारवाई सुरू केली आहे. सय्यद पिंप्री गावात मंगळवारी सकाळी नाशिक ग्रामीणचे पोलीस पोहचले. त्यांनी गावातील मशिदमध्ये अजान सुरू असताना आवाजाचे डेसिबल मोजले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पाडव्यादिवशी मुंबई शिवतीर्थावर सभा घेतली. या सभेत त्यांनी मशिदीवरील भोंग्याविरोधात टीकास्त्र सोडले. तसेच रमजानपर्यंत हे भोंगे उतरवले नाही, तर मशिदीसमोर हनुमान चालीसा पठणाचा इशारा दिलाय. शिवाय मनसे सैनिक आपल्या पद्धतीने हा विषय हाताळतील, असा निर्धारही त्यांनी केलाय. त्यामुळे नाशिकमधील पोलीस प्रशासन जागे झाले आहे. त्यांनी कुठल्याही प्रार्थनास्थळावर भोंगे लावण्यासाठी आता परवानगी सक्तीची केली आहे. शिवाय डेसिबलची मर्यादा पाळली नाही, तर कारवाईचा इशारा दिला आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें