अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, 11 वर्षानंतर दिल्लीवर महिला राज; नवा CM कोण?
आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी संध्याकाळी 4.45 वाजता लेफ्टनंट गव्हर्नर (एलजी) विनय सक्सेना यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका तोंडावर असताना राजधानी दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहे. अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी संध्याकाळी 4.45 वाजता लेफ्टनंट गव्हर्नर (एलजी) विनय सक्सेना यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यांच्यासोबत आतिशी आणि 4 मंत्री उपस्थित होते. दिल्ली सरकारने 26 आणि 27 सप्टेंबरला विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन बोलावले आहे. दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ फेब्रुवारी 2025 मध्ये संपत आहे. सरकारकडे निवडणुकीसाठी अवघे 5 महिने उरले आहेत. मात्र केजरीवाल यांना न्यायालयाने काही अटी घालून दिल्या आहेत. त्यातच तुरुंगातून सुटल्यानंतर केजरीवाल यांच्याबद्दल सहानुभूती लाट आहे. दिल्लीत दोन-तीन महिने अगोदर निवडणुका घेण्याची मागणी केजरीवाल यांना केली आहे. त्यातच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत त्यांनी एक नवी खेळी केली आहे. यापूर्वी आतिशी मार्लेना यांना दिल्लीचे मुख्यमंत्री करण्याची घोषणा करण्यात आली होती. केजरीवाल यांनी मंगळवारी आम आदमी पक्षाच्या (आप) विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. याला आमदारांनी सहमती दर्शवली.