Shahrukh Khan Son Bail | Aryan Khan ला जामीन नेमक्या काय अटींवर मिळाला ?

आर्यन खान याच्या वकिलांनी तब्बल तीन दिवस जोरदार युक्तिवाद केल्यानंतर अखेर आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना जामीन मिळाला आहे.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या वकिलांनी तब्बल तीन दिवस जोरदार युक्तिवाद केल्यानंतर अखेर आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना जामीन मिळाला आहे. त्यामुळे तब्बल 25 दिवसानंतर उद्या किंवा परवा शनिवारी आर्यन तुरुंगाबाहेर येईल.एनसीबीचे वकील अनिल सिंह यांनी आर्यनच्या जामिनाला विरोध केला होता. आर्यन खान गेल्या अनेक वर्षांपासून ड्रग्ज घेत आहे. त्याचं ड्रग्ज पेडलरशी कनेक्शन होतं. त्याच्या चॅटमधून या सर्व गोष्टी बाहेर आल्या आहेत. तो ड्रग्जची विक्रीही करायचा हेही त्याच्या चॅटमधून बाहेर आल्याचं अनिल सिंह यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. आर्यनला क्रुझवरील ड्रग्ज पार्टीची माहिती होती. क्रुझवर मोठी पार्टी होणार होती. त्याने कमीत कमी गांधी जयंतीच्या दिवशी असं करायला नको होतं, असंही अनिल सिंह यांनी सांगितलं. तर, आर्यनने पार्टी केलीच नाही असं त्याच्या वकिलांचं म्हणणं असल्याचं न्यायामूर्ती सांब्रे यांनी सांगितलं. आर्यन खान पहिल्यांदा ड्रग्ज घते नाही. तर आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट गेल्या अनेक वर्षापासून ड्रग्ज घेत असल्याचंही सिंह यांनी कोर्टाला सांगितलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI