Kiran Gosavi | आर्यन खान प्रकरणातील किरण गोसावीवर पालघरमध्ये 2 तरुणांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

पालघर जिल्ह्यातील एडवण येथील दोन तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी किरण गोसावी यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केळवे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोन तरुणांना परदेशात नोकरीनिमित्त पाठवण्यासाठी दीड लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे या दोन तरुणांची गोसावींनी फसवणूक केल्याचा दावा केला जात आहे. आर्यन खान प्रकरणात NCB ने ज्याला पंच केलाय, तोच फसवणुकीचं रॅकेट चालवत असल्याचा धक्कादायक आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे.

पालघरमधील दोन तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी किरण गोसावी यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात किरण गोसावी हा पंच आहे.

पालघर जिल्ह्यातील एडवण येथील दोन तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी किरण गोसावी यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केळवे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोन तरुणांना परदेशात नोकरीनिमित्त पाठवण्यासाठी दीड लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे या दोन तरुणांची गोसावींनी फसवणूक केल्याचा दावा केला जात आहे. आर्यन खान प्रकरणात NCB ने ज्याला पंच केलाय, तोच फसवणुकीचं रॅकेट चालवत असल्याचा धक्कादायक आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामध्ये एनसीबीने किरण गोसावी याला साक्षीदार बनवलेलं आहे. याच किरण गोसावीने अनेक तरुणांची फसवणूक करून त्यांना परदेशात नोकरी देण्याच्या आमिषाने लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. पालघर तालुक्यातील एडवण या गावातील दोन तरुणांचीही त्याने दोन वर्षांपूर्वी फसवणूक केल्याचा आरोप झाला आहे. उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे या दोन तरुणांना मलेशिया येथे कामाला लावतो असे सांगून त्यांच्याकडून दीड लाखाची मागणी गोसावी याने केली होती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI