AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आर्यन खान प्रकरणातील किरण गोसावीचा आणखी एका कारनामा, परदेशात नोकरीचं आमिष, पालघरच्या तरुणांना लाखोंचा गंडा

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील पंच किरण गोसावीबद्दल आणखी एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. किरण गोसावी याच्या विरुद्ध पुण्यातील पोलीस ठाण्यात तक्रार असल्याच उघडकीस आलं होतं.

आर्यन खान प्रकरणातील किरण गोसावीचा आणखी एका कारनामा, परदेशात नोकरीचं आमिष, पालघरच्या तरुणांना लाखोंचा गंडा
किरण गोसावी
| Edited By: | Updated on: Oct 10, 2021 | 11:40 AM
Share

मोहम्मद हुसेन खान, टीव्ही 9 मराठी, पालघर: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील पंच किरण गोसावीबद्दल आणखी एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. किरण गोसावी याच्या विरुद्ध पुण्यातील पोलीस ठाण्यात तक्रार असल्याच उघडकीस आलं होतं. आता पालघर जिल्ह्यातील दोघांची परदेशात नोकरी लावण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. पालघरच्या दोन तरुणांनी किरण गोसावीविरोधात तक्रार दिली आहे. आर्यन खान प्रकरणामधील NCB ने ज्याला पंच केलाय,तोच पंच किरण गोसावी फसवणुकीचं रॅकेट चालवत असल्याचा धक्कादायक आरोप पालघरमधील पीडित तरुणांनी केला आहे.

मलेशियात नोकरीचं आमिष

आर्यन खान च्या प्रकरणांमध्ये एनसीबीने किरण गोसावी याला साक्षीदार बनवलेलं आहे. याच किरण गोसावी यानं अनेक तरुणांची फसवणूक करून त्यांना परदेशात कामाला लावतो असे सांगून लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. पालघर तालुक्यातील एडवण या गावातील दोन तरुणांची ही त्याने दोन वर्ष आधी फसवणूक केली होती. उत्कर्ष तरे व आदर्श किनी या दोन तरुणांना मलेशिया येथे कामाला लावतो असे सांगून त्यांच्याकडून दीड लाखाची मागणी गोसावी याने केली होती.

फेसबुकवरुन ओळख

नवी मुंबई येथील कार्यालयातून तो हे चुकीचे धंदे फसवणुकीची रॅकेट चालवत होता. फेसबुकवरून मैत्री झाल्यानंतर उत्कर्ष व आदर्श याला मलेशियाला कामाला लावतो असे सांगितल्यानंतर दोघांनीही गोसावी याला बँक खात्यात पैसे दिले. त्यानंतर त्याने दोघांनाही विमानाचे तिकीट व विजा दिला कोचीन विमानतळावर पोहोचल्यानंतर विमानाचे तिकीट व विजा बोगस असल्याचे कळाल्यानंतर या दोघांनाही शॉक बसला. येथून ते पालघर येथे आले व पालघर येथे आल्यानंतर आपली फसवणूक झालेल्या प्रकरणी त्यांनी केळवा पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते.

आम्हाला न्याय द्या

केळवा पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही म्हणून दोघांनीही तक्रार अर्ज दाखल केला. त्यानंतर दोन वर्षे उलटूनही पोलिसांनी कारवाई केली नसल्याचे उत्कर्ष याने सांगितले आहे. माझ्यासारख्या अनेक तरुणांची फसवणूक झाल्याची दाट शक्यता असल्याचे उत्कर्ष याने सांगितले. आमच्या फसवणूक प्रकरणामध्ये किरण गोसावी याला पोलिसांनी पकडून त्याच्वर कायदेशीर कारवाई करावी. आम्हाला न्याय मिळवून द्यावा असे उतकर्ष तरे आणि आदर्श तरे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना उत्कर्ष तरे यांनी सांगितले.

आर्यन खान प्रकारणामधील पंच किरण गोसावी विरोधात फसवणूक केल्याची तक्रार केळवा पोलीस ठाण्यात दोन वर्षापूर्वी देण्यात आली होती. किरण गोसावी यानं फसवणूक केल्याचा आरोप उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे या दोन तरुणांनी केला आहे.

के. पी. गोसावी नेमका कोण?

व्हायरल झालेले कथित एनसीबी अधिकारी किरण गोसावी हे देशभरात, परदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या के.पी.जी. ड्रीम्ज रिक्रूटमेंट कंपनीचे मालक असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे के. पी. जी. ड्रीम्ज कंपनीचं मुंबई आणि नवी मुंबईत कार्यालय आहे. बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, खासगी गुप्तहेर अशीही के. पी. गोसावी यांची ओळख आहे. गोसावी सवत:च्या वाहनावर पोलिसांची पाटी लावून फिरताना कॅमेऱ्यात कैद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय नवाब मलिक यांनीही तसा दावा केला आहे. के. पी. गोसावी यांच्याविरोधात 2018 मध्ये पुण्यातील तरुणाकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. मलेशियात नोकरीचं आमिष दाखवून 3 लाख उकळल्याचा आरोप संबंधित तरुणाने केला होता, अशीही माहिती आता समोर येताना दिसत आहे.

इतर बातम्या:

आर्यन खानसोबत फोटो, एनसीबी म्हणते आमचा संबंध नाही, कोण आहे किरण गोसावी, ज्याच्यावर राष्ट्रवादीचा गंभीर आरोप?

Cruise Drug Party | क्रूझ ड्रग पार्टी प्रकरण, कोण आहे के.पी.गोसावी ?

Palghar two youth accused Kiran Gosavi panch in Aryan Khan drug case cheating them

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.