Ashish Shelar : मुंबईत मुसळधार.. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शेलारांकडून मुंबईकरांना एकच आवाहन; आज, उद्या…
मुंबईसह राज्यातील पावसाच्या परिस्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष असल्याचे सांगताना आशिष शेलार यांनी मुंबईकरांना एक आवाहन केलंय. पावसाच्या स्थितीमुळे अनेक ठिकाणी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवनावर परिणाम झाला आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला. यात प्रमुख चौक, रेल्वे वाहतूक सेवा आणि शाळा-महाविद्यालयांच्या स्थितीचा समावेश होता. मुंबई महानगर पालिका प्रशासन, मुंबई पोलीस, मुंबई वाहतूक पोलीस आणि इतर सर्व यंत्रणांसह अधिकारी मुसळधार पावसाने जिथे गरज आहे त्या ठिकाणी ऑन साईट हजर आहेत. दरम्यान, मुंबई लोकल सेवा काही मिनिटं उशिराने धावत आहेत मात्र त्या पूर्णतः अद्याप ठप्प झाल्या नाहीत आणि त्या होऊन नयेत याची व्यवस्था अचूक करावी अशी चर्चा केल्याचे आशिष शेलार यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, हवामान विभागाने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केल्यामुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आशिष शेलार यांनी मुंबईकरांना आवाहन केले आहे की, अत्यंत गरज असल्यासच घराबाहेर पडावे आणि शक्य असल्यास घरातच सुरक्षित राहावे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

