Ashish Shelar | मविआ सरकारला 2 वर्ष पूर्ण, आज वेदनांच्या प्रकटणीकरचा दिवस- आशिष शेलार

मी मंत्रालयात येणार नाही, मी अधिवेशन घेणार नाही. माझ्या पक्षा विषयी बोललात तर मुंडण करू, केंद्रीय मंत्री असलात तरी मुसक्या बांधून अटक करेल, असे म्हणणारे हे अहंकारी सरकार आहे. माझा उल्लेख चुकीचा केला म्हणून जुनी बंद झालेली केस ओपन करुन संपादकाला अटक करेन, असा फक्त अहंकार, अहंकार आणि अहंकार असलेले सरकार हे सरकार आहे, असं शेलार म्हणाले.

राज्यातील उद्धव ठाकरे सरकारने दोन वर्ष पूर्ण केली आहेत. त्यामुळे सरकारमधील नेत्यांनी सरकारच्या कामाची जंत्री सादर करायला सुरुवात केली आहे. तर भाजपकडून सरकारच्या कामाचा पंचनामा सुरू आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनीही ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. ठाकरे सरकार म्हणजे अहंकार… अहंकार… अहंकार असलेलं सरकार आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला करतानाच सरकारच्या कामाचा पंचनामा केला. मी मंत्रालयात येणार नाही, मी अधिवेशन घेणार नाही. माझ्या पक्षा विषयी बोललात तर मुंडण करू, केंद्रीय मंत्री असलात तरी मुसक्या बांधून अटक करेल, असे म्हणणारे हे अहंकारी सरकार आहे. माझा उल्लेख चुकीचा केला म्हणून जुनी बंद झालेली केस ओपन करुन संपादकाला अटक करेन, असा फक्त अहंकार, अहंकार आणि अहंकार असलेले सरकार हे सरकार आहे, असं शेलार म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI