मोठी बातमी! अशोक खरातला जामीन मिळणार का? कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! अशोक खरातला जामीन मिळणार का? कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?

| Updated on: Aug 31, 2026 | 3:59 PM

अशोक खरातच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता 16 सप्टेंबर रोजी होणार आहे. अशोक खरातने एका खटल्यात जामिनाची मागणी केली आहे. परंतु सरकारी पक्षाने याला विरोध करत, अशोक खरातने पीडित महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे आणि त्यांना धमकावल्याचे सविस्तर पुरावे न्यायालयात सादर केले आहेत. आज आरोपीचे वकील गैरहजर असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

अशोक खरातच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता 16 सप्टेंबर रोजी होणार आहे. सध्या सेशन कोर्टात असलेल्या 6 खटल्यांपैकी एका खटल्यात जामीन मिळावा, अशी विनंती अशोक खरातने न्यायालयाकडे केली आहे. आपला गुन्हा जामीनपात्र असल्याचा दावा त्याने केला आहे. मात्र, सरकारी पक्षाने या जामीन अर्जाला तीव्र विरोध केला आहे.

सरकारी पक्षाने न्यायालयात दाखल केलेल्या खुलाशात अशोक खरातला जामीन देऊ नये, अशी भूमिका मांडली आहे. विविध पीडित महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि त्यांच्या मनात निर्माण करण्यात आलेल्या भीतीच्या वातावरणाबाबत सविस्तर पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आल्याचे सरकारी पक्षाने म्हटले आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने 16 सप्टेंबर ही तारीख निश्चित केली आहे.

आज जामीन अर्जावर सुनावणी होऊ शकली नाही. अशोक खरातचे वकील काही न्यायालयीन कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यामुळे आज त्यांचा युक्तिवाद होऊ शकला नाही. मात्र, सरकारी पक्षाचे वकील न्यायालयात उपस्थित होते. त्यांनी जामिनाला विरोध करण्यासाठी आपली बाजू मांडली आणि ठोस कारणे तसेच पुरावे न्यायालयासमोर सादर केले. आता 16 सप्टेंबरला दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालय निर्णय घेणार आहे.

Published on: Aug 31, 2026 3:59 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us