Ranjeet Kasle : ‘मुंडेंनाच कराड नकोय’, असं म्हणणाऱ्या निलंबित पोलीस अधिकाऱ्यावर अॅस्ट्रॉसिटीचा गुन्हा, नेमकं घडलं काय?
मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती, असा मोठा गौप्यस्फोट बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी काल केला होता. दरम्यान, त्याच निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांच्यावर अॅस्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचा एन्काउंटर करण्यासाठी आपल्याला सुपारी मिळाली होती. त्यासाठी 5 ते 50 कोटी रुपयांची ऑफर देखील होती असा खळबळजनक दावा नुकताच निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्याकडूनच वाल्मिक कराडच्या एन्काउंटरचा प्रयत्न झाल्याचे म्हणत मुंडे धनंजय मुंडे यांनाच वाल्मिक कराड नको होते, असा गंभीर आरोप करणाऱ्या निलंबित पोलीस अधिकाऱ्यावर बीडमध्ये अॅस्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनुसूचित जमातीबद्दल वक्तव्य केल्याने निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर मतदारसंघात कुत्रादेखील निवडून येईल, असं वक्तव्य रणजीत कासले यांनी केलं होतं. तर जाणीवपूर्वक बोललो नाही, समाजाची माफी मागतो, असं रणजीत कासले म्हणाले आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

