Devendra Fadnavis | गिरीश कुबेरांवर शाईफेक, देवेंद्र फडणवीस म्हणतात, शाईफेकीचं कृत्य अयोग्य
नाशिकच्या साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडने शाईफेकली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संभाजी ब्रिगेडच्या या कृत्याचे समर्थन केलं आहे.
नाशिकच्या साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडने शाईफेकली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संभाजी ब्रिगेडच्या या कृत्याचे समर्थन केलं आहे. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हे कृत्य चुकीचे असल्याचं म्हटलं आहे. या घटनेबाबत भाजपच्या दोन्ही नेत्यांनी परस्पर विरोधी विधाने केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेकण्यात आल्याचं समजल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. साहित्य संमेलन हे अभिव्यक्तीचं केंद्रं असतं. तुम्हाला जर दुसरी अभिव्यक्ती व्यक्त करायची असेल तर दुसर कुठेही करता येते. अभिव्यक्ती करण्याऐवजी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे आणि शाईफेक करणे योग्य नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

