Sanjay Raut : काश्मिरी पंडितांवरील हल्ले हे पंतप्रधानांचं अपयश, संजय राऊतांचा हल्लाबोल
शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावेळी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. तर काश्मिरी पंडितांच्या मुद्दयावरुनही लक्ष्य केलंय.
मुंबई : ‘आठ वर्ष कसले साजरी करताय? असा संतप्त सवार करतानाच भाजपला (bjp) टीका करायला काय झालं? काश्मीर पंडित मरत आहेत. त्यावर बोला, ‘ असा सवाल करत पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, काश्मिरी पंडितांवरील हल्ले हे पंतप्रधानांचं अपयश, असं त्यांनी यावेळी माध्यंशी बोलताना म्हटलं आहे. 5 जून रोजी आम्ही आदित्य ठाकरेंच्या (Aaditya Thackeray) नेतृत्वात अयोध्येला (aayodhya) जाणार आहोत, असंही यावेळी राऊत म्हणाते. दरम्यान, हा कोणताही राजकीय दौरा नसून कोणतंही शक्तीप्रदर्श नसून आम्ही दर्शनासाठी जाणार आहोत, असंही राऊतांनी यावेळी सांगतिलंय. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. तर काश्मिरी पंडितांच्या मुद्दयावरुनही लक्ष्य केलंय.
Published on: Jun 05, 2022 12:31 PM
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...

