Nagpur | नागपूर विधान परिषदेसाठी अतुल लोंढेंची वर्णी?; उमेदवारी जवळपास निश्चित! -सुत्र
स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीने आपल्या उमेदवारांची घोषणा केली असून अनेक उमेदवारांनी अर्जही दाखल केले आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवारांबाबतही अंतिम टप्प्यातील चर्चा सुरू आहे
स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीने आपल्या उमेदवारांची घोषणा केली असून अनेक उमेदवारांनी अर्जही दाखल केले आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवारांबाबतही अंतिम टप्प्यातील चर्चा सुरू आहे.
दरम्यान, नागपूर विधान परिषद मतदारसंघासाठी काँग्रेस नेते अतुल लोंढे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीकडून अतुल लोंढे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. पक्षश्रेष्ठींकडून अंतिम शिक्कामोर्तब होण्याची औपचारिकता बाकी असल्याचे सांगितले जात आहे.
नागपूर विधान परिषद निवडणुकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले असून, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी आणखी काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
