Aurangabad | नमाज पठण करताना Imtiaz Jaleel भावूक, औरंगाबादच्या ईदगाह मैदानावर काय घडलं?
इथे फक्त मुस्लिम नव्हे तर देशातील सर्व धर्माच्या लोकांच्या शांततेसाठी आम्ही प्रार्थना केल्याचं खासदार जलील यांनी सांगितलं.
औरंगाबादः तब्बल दोन वर्षानंतर औरंगाबादच्या ईदगाह (Eidgah Ground) मैदानावर हजारो मुस्लिम भाविक नमाज अदा करण्यासाठी जमा झाले. यावेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) हेदेखील उपस्थित होते. सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास मुस्लिम भाविकांनी (Muslim Devotees) नमाज पठणास सुरुवात केली. नमाज म्हणजे अल्लाहकडे क्षमा याचना करण्याचा प्रसंग असतो. यावेळी खासदार इम्तियाज जलील अत्यंत भावूक झाले. नमाज पठण सुरु असतानाच त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. एकिकडे नमाज पठण सुरु होते तर इकडे खासदार जलील डोळ्यांतील अश्रू पूसत होते. त्यामुळे इम्तियाज जलील एवढे भावूक का झाले, असाच प्रश्न सर्वांच्या मनात आला. मात्र नमाज पठण झाल्यानंतर स्वतःच्या भावना आवरत खासदार जलील यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना अश्रू येण्याचं कारण सांगितलं.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

