Aurangabad | रस्ता नसल्याने रुग्णाला खाटेवरून नेलं, कन्नडमधील नागरिकांचा संताप

गावाला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे शिवना टाकळी गावातील एका रुग्णाला चक्क बाजेवर टाकून तीन किलोमीटर चालत आणल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबाद जिल्ह्यात घडला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील शिवना टाकळी या गावातील 200 लोकवस्ती असलेल्या एका वाडीला स्वातंत्र्यापासून रस्ताच बनवण्यात आला नाही.

गावाला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे शिवना टाकळी गावातील एका रुग्णाला चक्क बाजेवर टाकून तीन किलोमीटर चालत आणल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबाद जिल्ह्यात घडला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील शिवना टाकळी या गावातील 200 लोकवस्ती असलेल्या एका वाडीला स्वातंत्र्यापासून रस्ताच बनवण्यात आला नाही. त्यामुळे चिकन गुणिया हा आजार झालेल्या एका रुग्णाला थेट बाजेवर टाकून रुग्णालयात घेऊन जावं लागल्याचा प्रकार घडला आहे. यावेळी रुग्णाला खांद्यावर घेऊन चिखलातून मार्ग काढताना गावातील तरुणांचे हाल झाल्याचं समोर आलं आहे. गावाला रस्ता नसल्यामुळे गावातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI