
Aurangabad | औरंगाबादच्या ओझर गावात गावगुंडांकडून मेंढपाळांना बेदम मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल
औरंगाबाद जिल्ह्यातील ओझर गावातील गावगुंडांनी मेंढ्या चारणाऱ्या मेंढपाळांना बेदम मारहाण केलीय. मारहाणीत चार ते पाच मेंढपाळ गंभीर जखमी झाले आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील ओझर गावातील गावगुंडांनी मेंढ्या चारणाऱ्या मेंढपाळांना बेदम मारहाण केलीय. मारहाणीत चार ते पाच मेंढपाळ गंभीर जखमी झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील खिर्डी गावातील मेंढपाळांना ही मारहाण झालीय. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गोदावरी नदीच्या परिसरात मेंढपाळ मेंढ्या चारत होते. त्यावेळी तिथे जवळपास 10 ते 15 गावगुंड हातात लाठ्या-काठ्या घेऊन आले. त्यांनी थेट मेंढपाळांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात चार-पाच मेंढपाळ जबर जखमी झाले आहेत. मारहाण करणाऱ्या तरुणांवर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पण अजूनही मारहाण करणाऱ्या आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आलेली नाही.
Published on: Jul 15, 2021 10:48 AM
Related Video
शिक्षकावर जीवघेणा हल्ला, माजी विद्यार्थ्याने केले सपासप वार
PM नरेंद्र मोदी यांचे सचिवांना आदेश, आत्मनिर्भर भारताला गती द्या...
1 जुलैपासून हे 6 प्रमुख नियम बदलणार, आयटीआरपासून बँकिंगपर्यंत परिणाम
मुंबईकरांसाठी रात्र धोक्याची, मुसळधार पावसाचा इशारा
चांगला की वाईट? जुलै महिन्याचा पहिला दिवस कसा असेल? राशीभविष्य काय?
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा