VIDEO : Avighna Park Fire | 19 व्या मजल्यावर आग, 20 व्या मजल्यावर राहणाऱ्या महिलेने काय सांगितलं?
मुंबईतील करी रोड परिसरात रहिवासी इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. करी रोड आणि लोअर परेल स्टेशनजवळ असलेल्या अविघ्न टॉवर या साठमजली इमारतीमध्ये 19 व्या मजल्यावर आग लागली. 19 व्या मजल्यावर फर्निचरचं काम सुरु असल्याची माहीती मिळत आहे आणि यातूनच आग लागल्याची माहिती आहे.
मुंबईतील करी रोड परिसरात रहिवासी इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. करी रोड आणि लोअर परेल स्टेशनजवळ असलेल्या अविघ्न टॉवर या साठमजली इमारतीमध्ये 19 व्या मजल्यावर आग लागली. 19 व्या मजल्यावर फर्निचरचं काम सुरु असल्याची माहीती मिळत आहे आणि यातूनच आग लागल्याची माहिती आहे. आता यावर सोसायटीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोसायटीतले लोक सांगत आहेत की, वॉटर सिस्टम चालू नव्हती. करी रोड परिसरात असलेल्या माधव पालव मार्गावरील अविघ्न टॉवर या टोलेजंग इमारतीमध्ये दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. 19 व्या मजल्यावर आग लागल्यानंतर दुरुन आगीचे लोट आणि काळसर धूर दिसत होता.
Latest Videos
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?

