: “भूतकाळतले कटू अनुभव बघता आमची युती…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांवर अविनाश अभ्यंकर स्पष्टच बोलले…
उद्धव ठाकरे यांनी आजच्या मुलाखतीत राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीचा प्रश्नावर परखड मत व्यक्त केलं आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई, 27 जुलै 2023 | ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल आणि आज प्रखर मुलाखत प्रसारीत झाली. उद्धव ठाकरे यांची मुलाखत पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी घेतली. या मुलाखतीत राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीचा प्रश्न विचारला आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी परखड मत व्यक्त केलं आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “प्रश्न विचारणारे पण त्यांच्या घरचे होते आणि मुलाखत देणारे पण घरचे होते, आणि आजपर्यंच आमचे जे कटू अनुभव बघता आमची युती होईल असं वाटत नाही.”
Published on: Jul 27, 2023 03:22 PM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

