Avinash Jadhav : मोठी बातमी; अखेर पोलीस नमले, अविनाश जाधवांना सोडलं; बाहेर येताच म्हणाले, मराठीचा माज…
मोर्चा होण्यापूर्वी आम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. आमच्यावर कारवाई केली.. पोलिसांनी इतकंही दबावात काम करू नये, अशी प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी बाहेर येताच दिली.
‘मीरा भाईंदरमधील लोकांचे, मराठी माणसाचे मी आभार मानतो. आम्ही नसतानाही मोठ्या प्रमाणात मराठी माणसं रस्त्यावर उतरली. मराठीचा माज काय हे त्यांनी दाखवून दिलं.’, पोलिसांनी मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांना सोडताच त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. दरम्यान, अमराठी व्यापाऱ्यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून मीरा भाईंदरमध्ये मनसेकडून आज मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र यापूर्वीच या मोर्चाला परवानगी नाकारत प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांकडून कऱण्यात आली.
यासंदर्भात आज मंगळवारी पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास पोलिसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले होतं. अविनाश जाधव यांना त्यांच्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मनसैनिक आणि मराठी जनता चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास मोठ्या पोलीस फौजफाट्यासह अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं त्यानंतर त्यांना काशिमीरा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. मनसैनिकांच्या इशाऱ्यानंतर पोलीस नमले आणि त्यांनी अविनाश जाधव यांना सोडल्याचे पाहायला मिळत आहे.

