VIDEO : Sanjay Raut On PM Modi | जर मोदी 10 लाख लोकांना नोकऱ्या देणार असतील तर त्यांचे स्वागत आहे – Raut
आजही राहुल गांधी यांची चौकशी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. तसेच यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, जर मोदी 10 लाख लोकांना नोकऱ्या देणार असतील तर त्यांचे नक्कीच स्वागत आहे. समाजवादी पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, तृणमूलसह जे भाजपसोबत नाही त्यांना बडगा दाखवण्याचं काम सुरू आहे.
आजही राहुल गांधी यांची चौकशी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. तसेच यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, जर मोदी 10 लाख लोकांना नोकऱ्या देणार असतील तर त्यांचे नक्कीच स्वागत आहे. समाजवादी पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, तृणमूलसह जे भाजपसोबत नाही त्यांना बडगा दाखवण्याचं काम सुरू आहे. याला राज्य करणे म्हणत नाही. ही एक प्रकारची झोटिंगशाही आहे. ही हुकूमशाही नाही. झोटिंगशाही ही हुकूमशाहीच्या पुढची पायरी आहे, असं राऊत म्हणाले. विरोधकांची एकजूट असो नको, विरोधकांना त्रासा दिला जात आहे. तपास यंत्रणाचा वार करून फूट पाडली जात आहे. बहुमत मिळवलं जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण

