Babanrao Lonikar : मी शेतकऱ्यांची हजार वेळा माफी मागेल, पण..; बबनराव लोणीकर संतापले
Maharashtra Assembly Mansoon Session : भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर देत विरोधकांना धारेवर धरलं आहे.
मी एकदाही शेतकऱ्यांच्या विरोधात बोलललो नाही. तरीही मी शेतकऱ्यांची एक हजार वेळा माफी मागायला तयार आहे. पण मी यांची माफी मागणार नाही, अशी आक्रमक भूमिका भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत घेतली आहे. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशना कालपासून बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त विधान व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानसभेत तीव्र पडसाद उमटत आहेत.
त्यावर बबनराव लोणीकर यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांना धारेवर धरलं. बबनराव लोणीकर विधानसभेत बोलताना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले, दोन दिवस माझ्या नावाचा उल्लेख केला जात आहे. हा माझा हरकतीचा मुद्दा आहे. जे मी आयुष्यात कधी बोललो नाही. 40 वर्ष मी राजकारणात आहे. मी शेतकरी विरोधी वक्तव्य केल्याचे म्हटले जात आहे. पण मी असे काही बोललोच नाही. काही लोक राजकारण करत आहेत. माझ्या मृत्यूनंतर माझे हाड सुद्धा म्हणतील की मी शेतकरी आहे. मी शेतकऱ्यांची एक हजार वेळा माफी मागेल, पण मी यांची माफी मागणार नाही, असंही लोणीकर यांनी यावेळी म्हंटलं.

राड्यानंतर राहुल नर्वेकरांचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर

ना हनी, ना ट्रॅप..; हनीट्रॅपवर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया

सगळे आमदार माजले... फडणवीसांनी भर सभागृहात कोणाला फटकारलं?

बदनापूर तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस; शेतांना आलं तळ्याचे स्वरूप
