Bacchu Kadu | मंत्र्याच्या चालकाला 40000 आणि एसटी कर्मचाऱ्याला 12000 पगार हे चुकीचं – बच्चू कडू

मंत्र्यांच्या आणि कलेक्टरच्या गाडीच्या ड्रायव्हरला 40 हजार आणि एसटी कर्मचाऱ्याला 12 हजार पगार हे चुकीचंच असल्याचं बच्चू कडू म्हणाले. सांगलीच्या इस्लामपूरमधील कृषी प्रदर्शन उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

सांगली : एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. त्याबाबत परिवहनमंत्री अनिल परब यांनी घोषणा करतानाच एसटी कर्मचाऱ्यांना संप  मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, राज्यातील जवळपास 90 हजारपैकी 73 हजार एसटी कर्मचारी अद्यापही संपावर ठाम आहेत. एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण या एकाच मुद्द्यावर एसटी कर्मचारी ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. मंत्र्यांच्या आणि कलेक्टरच्या गाडीच्या ड्रायव्हरला 40 हजार आणि एसटी कर्मचाऱ्याला 12 हजार पगार हे चुकीचंच असल्याचं बच्चू कडू म्हणाले. सांगलीच्या इस्लामपूरमधील कृषी प्रदर्शन उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

Published On - 9:37 pm, Mon, 29 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI