Bachchu Kadu : बच्चू कडूंची आज फडणवीसांसोबत चर्चा, शेतकऱ्यांच्या आंदोलनाची पुढील दिशा काय? बैठकीनंतर सगळं…
बच्चू कडू आज देवेंद्र फडणवीसांसोबत बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहेत. शेतकरी कर्जमाफी, जिल्हा बँकांना मदत, दिव्यांग आणि मेंढपाळांच्या मागण्यांवर चर्चा होणार आहे. नागपूरमधील भव्य आंदोलनातून शेतकऱ्यांचा रोष व्यक्त झाला असून, गरीब शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीची मागणी कडू यांनी लावून धरली आहे.
नागपूरमध्ये शेतकऱ्यांच्या महाएल्गार मोर्चानंतर, शेतकरी नेते बच्चू कडू यांनी महाराष्ट्र सरकारसोबत आज महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत देवेंद्र फडणवीसांसह मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार असून, त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल, असे कडू यांनी सांगितले. सकाळी 9 वाजता शिष्टमंडळाची अंतर्गत बैठक झाल्यानंतर 12 वाजता मुंबईसाठी प्रस्थान करणार आहेत.
या आंदोलनात मनोज जरांगे पाटील हे देखील एक शेतकरी म्हणून सहभागी झाले आहेत. गरीब शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीची मुख्य मागणी असून, 2008 च्या कर्जमाफीतील त्रुटी, व्यावसायिक कर्जांचा समावेश, तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना मदत देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
दिव्यांग बांधवांच्या मानधनासह घरकुल, शिक्षण आणि मेंढपाळांसाठी चराई क्षेत्राच्या उपलब्धतेची मागणी देखील या बैठकीत मांडली जाणार आहे. बच्चू कडू यांनी राजकीय दृष्ट्या या आंदोलनाकडे पाहण्यास नकार दिला असून, सर्व शेतकरी संघटना आणि विविध सामाजिक घटकांना एकत्र आणण्याचे यश शेतकऱ्यांच्या एकजुटीचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे. आजच्या बैठकीतून तोडगा निघण्याची शक्यता कडू यांनी व्यक्त केली.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात

