Bachchu Kadu : कर्जमाफीची तारीख द्या, अन्यथा… बच्चू कडूंचा आक्रमक पवित्रा, 6 जणांचं शिष्टमंडळ आज मुंबईत, फडणवीसांना कोण-कोण भेटणार?
शेतकरी नेते बच्चू कडू कर्जमाफीची निश्चित तारीख मिळावी यासाठी आक्रमक झाले आहेत. ते मुख्यमंत्र्यांशी मुंबईत चर्चा करणार असले तरी, कर्जमाफीची तारीख न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करत रेल्वे बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक असल्याचे म्हटले असून चर्चेचे आवाहन केले आहे.
शेतकरी नेते बच्चू कडू यांनी कर्जमाफीची निश्चित तारीख जाहीर न झाल्यास राज्यभर रेल्वे बंद करण्याचा इशारा दिला आहे. आज ते मुख्यमंत्र्यांशी मुंबईत चर्चा करणार आहेत, मात्र हे आंदोलन थांबवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील सहा सदस्यीय शिष्टमंडळात महादेव जानकर, राजू शेट्टी, अजित नवले, वामन चटप आणि राजन क्षीरसागर यांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ कर्जमुक्तीच्या शासन निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेतली असून बच्चू कडूंना चर्चेचे निमंत्रण दिले आहे. लोकांना त्रास होईल असे आंदोलन करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांसाठी ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या बैठकीत कर्जमाफीच्या तारखेवर आणि अंमलबजावणीवर चर्चा अपेक्षित आहे.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात

