मलिक देशमुखांचा जेलमधील मुक्काम वाढणार
अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, संजय राऊत यांच्या तपासालाही आता गती मिळणार असून मलिक आणि देशमुख यांचा जेलमधील मुक्काम वाढणार आहे. त्यामुळे जे जे नेते वेगवेगळ्या आरोपामुळे जेलमध्ये गेले आहेत, ते सध्या तरी जेलबाहेर येऊ शकणार नाहीत.
नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे आता त्यांचा जेलमधील मुक्काम वाढणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे. आता एनआयकडूनही अजून तपास होणार असल्याने मलिकांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचेही सोमय्यांनी सांगितले. अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, संजय राऊत यांच्या तपासालाही आता गती मिळणार असून मलिक आणि देशमुख यांचा जेलमधील मुक्काम वाढणार आहे. त्यामुळे जे जे नेते वेगवेगळ्या आरोपामुळे जेलमध्ये गेले आहेत, ते सध्या तरी जेलबाहेर येऊ शकणार नाहीत. या नेत्यांनी ज्यावेळी जामीनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला त्यावेळीच त्यांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

