Ashram 3 | ‘आश्रम 3’ वेब सीरीजच्या सेटवर बजरंग दलाचा हल्ला

अभिनेता बॉबी देओलच्या ‘आश्रम’ (‘Ashram 3’) या वेब सीरीजचे दोन्ही सीझन खूप पसंत केले गेले होते. आता प्रकाश झा यांनी या वेब सीरीजच्या तिसऱ्या सीझनची तयारी सुरू केली आहे. ‘आश्रम 3’चे शूटिंग भोपाळमध्ये सुरू झाले आहे.

मुंबई : अभिनेता बॉबी देओलच्या ‘आश्रम’ (‘Ashram 3’) या वेब सीरीजचे दोन्ही सीझन खूप पसंत केले गेले होते. आता प्रकाश झा यांनी या वेब सीरीजच्या तिसऱ्या सीझनची तयारी सुरू केली आहे. ‘आश्रम 3’चे शूटिंग भोपाळमध्ये सुरू झाले आहे. ही वेब सीरीज पूर्वी देखील हेडलाईन्सचा भाग होती आणि आता पुन्हा एकदा चर्चेचा भाग बनली आहे.बजरंग दलाच्या लोकांनी भोपाळमधील ‘आश्रम 3’ या वेब सीरीजच्या सेटची तोडफोड केली आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, बजरंग दलाच्या लोकांनी प्रकाश झा यांच्या चेहऱ्यावरही शाई फेकली आहे. या सीरीज नाव बदलावे अन्यथा मध्य प्रदेशात मालिकेचे शूटिंग होऊ देणार नाही, असे त्यांचे म्हणणे होते.

 

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI